02/11/2026   |   Monday मराठी बातम्यांचे विश्वसनीय व्यासपीठ
LIVE UPDATES WATCH

जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दीपक भोसले; व्हाईस चेअरमनपदी वृषाली वाघ यांची बिनविरोध निवड

ही बातमी मित्रांना शेअर करा
WhatsApp वर शेअर करा

अमळगावच्या दीपक भोसले यांच्यावर चेअरमनपदाची जबाबदारी; ग्रामस्थांसह पीक संरक्षण सोसायटीकडून अभिनंदन

अमळगाव | प्रतिनिधी

जळगाव जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अमळगाव येथील रहिवासी श्री. दीपक संभाजीराव भोसले, तर व्हाईस चेअरमनपदी भडगाव येथील श्रीमती वृषाली वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे अमळगाव परिसरात आनंदाचे वातावरण असून, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

राज्याध्यक्ष आप्पासाहेब श्री. संजीवजी निकम आणि जिल्हाध्यक्ष श्री. नंदकुमार गोराडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच ग्रामपंचायत अधिकारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमळगाव येथील दीपक संभाजीराव भोसले यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या निवडीबद्दल अमळगाव येथील ग्रामस्थ तसेच पीक संरक्षण सोसायटी, अमळगाव यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

नवनिर्वाचित चेअरमन श्री. दीपक संभाजीराव भोसले आणि व्हाईस चेअरमन श्रीमती वृषाली वाघ हे पतसंस्थेच्या प्रगतीसाठी, सभासदांच्या हितासाठी तसेच ग्रामपंचायत अधिकारी बांधवांच्या कल्याणासाठी प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

SSP NEWS • विश्वासार्ह पत्रकारिता
ही बातमी शेअर करा: WhatsApp
RELATED STORIES

संबंधित बातम्या